Monday, 2 March 2009

फूलचंद

अजुनही आठ्वतो आहे तो दिवस...असे काही स्पेशल नव्ह्ते घड्ले पण एक नवीन experience अनुभवला होता. १५ august 2008...माझ्या काकांची engagement होती.सलग तीन दिवस जोडुन सुटटी...त्यामुळे आमच्या सारख्या मुबंईत राहणारया कोल्हापुर करांसाठी एकप्रकारची पर्वणीच..आदल्या दिवशी म्हण्जेच १४ ला रात्री गाडी पकड्ली आणि १५ ला सकाळी कोल्हापुर॥

Engagement आणि family membersna भेट्त-भेट्त दिवस एकदम मजेत चालला होता.जेवण झाले आणि मग गप्पांना उत आला.गप्पा सुरु असतानाच माझ्या एक cousinla पान खाण्याची हुक्की आली.साहेबांनी ४ wheelar काढली आणि मग तो, मी आणि माझा भाउ असे आम्ही तिघे गाडीत बसुन पान खायला गेलो.Cousinne गाडी शारदा cafe जवळ्च्या एका पानपट्टीवर लावली.मी गाडीतच बसुन होतो.Cousin आणि माझा भाउ गाडीतुन उतरले.Cousinne मला विचारले "फूलचंद" घेणार काय रे? तसे पान म्हन्जे माझी उडी साधे पान किंवा मसाले पान ईथपर्यंनत्च...पण "फूलचंद" हा मसाले पानचाच एक प्रकार असेल असे समझुन मी त्याला बिनदास्तपणे हो म्हणुन सांगितले.जाताने त्याने पुन्हा विचारले..."फूलचंद with double रिमझिम" घेउ का?...माझे उत्तर..अरे घे रे बाबा चालेल...

२-३ मिनिटातच ते दोघे पान घेउन आले.Cousinne एक छोटेसे पान हातावर ठेवले.त्याअगोदर मी तसले पान कधी बघितलेच नव्ह्ते.क्षणाचाहि विसंब न करता मी ते तोंडात टाकले.काय सांगु....ईतके तिखट पान होते ते...कोल्हापुरातल्या कुठ्ल्याही(चमचमीत) खाणारया व्यक्तीला ते पान जड गेले असते.पट्कन मी ते पान अर्धे तोड्ले आणि पोटात ढ्कलले.गाडीत मी पुढच्याच सीट्वर बसलो होतो.थोड्याच वेळात या पानाचा असर असा काही झाला कि समोरील माणसांच्या ४-४ प्रतिक्रुती मला दिसायला लागल्या.शेवटी राहवले नाही म्हणुन cousinla विचारले काय आहे बाबा हे? तो म्हणाला ..अरे या अगोदर खाल्ले आहेस ना? मी नाक मुरड्त नाही म्हणालो.त्यावर तो म्हणाला ठिक आहे पण आता ते गिळु नकोस...मी म्हणालो अरे गिळु नको काय...अर्धे पान तर आधीच गिळले आहे. Then he said...व्वा... आता सीट्वर डोके ठेवा आणि निवांत बसा।

थोडयाच वेळात एकापाठोपाठ एक अशा उचक्या सुरु झाल्या.परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेउन Cousinne गाडी साईड्ला उभी केली,आणि काही कळायच्या आतच...........होय.......दुपारचे सगळे जेवण बाहेर पडायला लागले.थोडे बरे वाट्ले की मी गाडीत जाउन बसायचो..पण गाडी सुरु झाली की पुन्हा ते सत्र सुरु.....हा खेळ थोडा वेळ सुरुच होता.थोड्याच वेळात आम्ही नव्याने झालेल्या hockey stediumchya आवारात आलो.गाडी पार्क केली आणि मी बाहेर वारयात जाउन बसलो.....बसतोय कुठला...एका piller la जाउन टेकलो.अंगातली सर्व energy अचानक गायब झाली होती.तिथेच थोडी शतपावली केली[cousin आणि भावाचा आधार घेउन] आणि गाडीत जाउन बसलो.cousinla म्हणालो भावा बस.....आता घरी सोड....घरी गेलो..आईला थाप मारली...आद्ल्या दिवशीचा प्रवास आणि दिवस भरातील धावपळ यामुळे डोके दुखत आहे म्हणुन....आणि मग नीद्रेच्या आहारी गेलो....

त्यादिवशी मला Kick बसणे [दारु आणि सिगारेट पीत नसल्यामुळे] म्हण्जे काय ते समझले.तेव्हापासुन त्या "फुलचंद्चा" परिणाम असा काही झाला आहे की मसाले पान देखील विसरुन गेलो आहे मी.....

2 comments:

  1. Atul,

    Mi hi hya anubhavatun geloy.
    Fakt kadachit Punyache Fulchand aslyane KICK
    yevadhi jorat nhavati. Pan paristhiti avaghad hoti. Bayko an porala ghevun mi gadi chalvat hoto an achanak sarech gar garayala lagale.

    Sarkhach anubhav vachun lihavishi vatli comments.

    Vinay Jirgale

    ReplyDelete