Tuesday, 31 March 2009

एप्रिल फुल बनाया.....

३१ मार्च २००६. रात्रीच्या ११ ते ११.३० ची वेळ. दुसरया दिवशी शनिवार, ऑफिसला सुट्टी असल्याने झोपेचे काही नांवच नव्हते. त्यावेळी मी, सुशिल [माझा ईंजिनिअरींगचा चा मित्र] आणि नितिन [माझा ज्युनिअर] असे आम्ही तिघे अंधेरीत एका फ्लॅट्वर रहात होतो. त्याच अपार्टमेंट मध्ये माझा आणखीन एक ईंजिनिअरींगचा चा मित्र निखिल, संजय [महा आळ्शी] आणि शिवा [वारणेचा वाघ] दुसरया फ्लॅट्वर रहात होते.

त्या रात्री मी माझ्या नेहमीच्या सवई प्रमाणे सर्व मित्रांना मिस कॉल्स मारत बसलो होतो. पण शेवटी माझेच मित्र ते...च्यामारी एकाने पण कॉल नाही केला. शेवटी मी आळ्शीला म्हण्जेच संजयला टार्गेट केले. तेथुन पण काही उत्तर नाही. वैतागुन झोपणार तोच नितिनला एक युक्ति सुचली. तो मला म्हणाला hey DJ [My Nick Name.] lets fool them.या नितिन बद्द्ल काय बोलायचे.एका वाक्यात वर्णन करायचे तर "गरीब गाय आणि पोटावर पाय". त्यानंतर आम्ही तिघांनी मिळुन त्या युक्तित थोडासा बद्ल केला.

मी आळ्शीला फोन केला. फोन उचलल्यावर त्याने २-४ शिव्या घालुन मी दिलेल्या मिस कॉल्स बद्ला घेतला.त्यानंतर.....

मी: अरे नितिनचा काही फोन वैगैरे आला होता काय ? २ दिवस झाले तो रूमवर आलेला नाही. साधा फोन पण केलेला नाही माकडाने.
आळ्शी: काय !
निखिल आणि शिवा: काय झाले रे संज्या? [त्या रूमवरचे वातावरण थोडेसे तंग]
आळ्शी: अरे काही भांडण वैगैरे नाही झाले ना तुमच्यात ?
मी: नितिनचे आणि सुशिलचे काही तरी बिनसले आहे. सुशिल काहीच सांगत नाही आहे. तु बघ ना नितिनला फोन करुन, कदाचित तुझा फोन उचलेल तो. एव्हडे बोलुन मी फोन ठेवुन दिला.

आमची युक्ति आता काम करु लागली होती. थोड्याच वेळात आळ्शीचा नितिनला फोन आला. आम्ही तो फोन कट केला. पुन्हा त्याने फोन केला. पुन्हा आम्ही तो कट केला. १० मिनिटांनी पुन्हा त्याचा फोन आला. आता मात्र आम्ही तो उचलला.

नितिन: बोल रे संज्या.
आळ्शी: अरे बाबा तु कुठे आहेस? कुडीने [My Nick Name॥no 2] सांगितले की तु २ दिवस झाले रूमवर गेलेला नाहीस. काय झाले?
नितिन: अरे काही नाही.मी ती रूम सोड्ली आहे. आता पुन्हा नाही जाणार मी त्या रूमवर.

एव्ह्डे बोलुन नितिनने फोन ठेवुन दिला.
नितिनचे हे बोलणे एकुन ते तिघे जण द्चकले. त्या नंतर निखिलने मला फोन लावला.

निखिल: कुड्या आता आम्ही नित्याशी बोललो. अरे तो असे...असे बोलत होतो.
मी: ओ.....तुम्ही आमच्या रूमवर येता काय? आपण सुशिलशी बोलुण बघु.

त्या तिघांना रूमवर बोलवण्या मागे देखिल एक कारण होते. त्यादिवशी आमच्या अपार्टमेंटची लिफ़्ट बंद होती. ते तिघे १ ल्या मजल्यावर आणि आम्ही तिघे ६ व्या मजल्यावर रहात होतो.

नित्या ला आम्ही किचन मध्ये लपायला सांगितले होते. सुशल्या चादर डोक्यावर घेउन पड्ला होता. एव्हड्यातच हे तिघे ह्ज़र झाले.मी दरवाज़ा उघड्ला. तिघे धापा टाकत टाकत वर आले होते. बिचारे ५ मज़ले चढुन बेकार दमले होते. त्या तिघांची ती अवस्था बघुन ईतके हसु आले होते...काय सांगु...कसे बसे हसु सावरत आत आलो. थोडयावेळेच्या शांततेनंतर निखिलने सुशल्यावर हल्ला चडवला.

निखिल: सुशल्या...काय झाले रे?
सुशिल: ..............................
निखिल: "आयला झोपलेल्याला उठ्वता तरी येते.....झोपेचे नाट्क करणारयाला कसे उठ्वायचे" असे म्हण्त त्याने त्याची चादर ओढुन घेतली.
सुशिल: झोपु दे रे मला.
निखिल: आयला एव्ह्डे मोठे झाला आहात काही समजते की नाही तुम्हाला? तुम्हाला माहीती आहे ना...आपण सगळे घरापासुन ४५० की.मी. दुर राह्तो ते [kolhapur - Mumbai...450 kms]...आणि तरीपण एकमेकाबरोबर भांड्ता. चल फोन लाव नित्याला.
सुशिल: मी काही नाही बोलणार त्याच्याबरोबर.
निखिल: संज्या नित्याला फोन लाव रे.
आळ्शी: मगाशी मी लावला होता. आता तु लाव.

त्याला शिव्या देत निखिलने नितिनला फोन लावला. फोनची रिंग आम्हा सगळ्यांनाच ऎकु आली. ते तिघे एकमेकांकडे बघु लागले. तेव्ह्ड्यात नितीन आतुन ओरड्त बाहेर आला.....एप्रिल फूल...एप्रिल फूल.....मी आणि सुशिल पण उठ्लो...एप्रिल फूल...एप्रिल फूल...

ते तिघे बिचारे मान खाली घालुन शांत बसले होते. एक शब्दही न बोलता ते निघुन गेले. आम्ही तिघे मस्त हसत हसत त्या रात्री झोपुन गेलो.दुसरया दिवशी सकाळी मात्र चहा प्यायला जाताना त्या तिघांनी कोल्हापुरी डिक्शनरीतल्या असतील नसतील त्या शिव्या आम्हाला हाद्ड्ल्या....

6 comments:

  1. Sahiiii !!!
    tya diwashichi aathavan karun dilis .....
    Ek numberrrr .......
    Good going .. keep it up ...
    :)

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Ek number!!!!
    6th floor chi aathvan jhali.........

    ReplyDelete
  4. sahi bhaoji............nikhilchya id warun mi lihit aahe mastch......ashech majedar kisse jara amala pan sanga

    ReplyDelete
  5. From Sushil :

    Zakkas bhava .... 6th floor .. amazing room ... will never forget the moments we spend together ... those were the best days of my life !!!

    ReplyDelete